अध्यक्षांचे मनोगत…

मा. प्रतापशेठ (दादा) साळुंखे

सन २००२ साली गलाई व्यवसायीकांनी एकत्र येऊन माझ्याकडे संस्था स्थापने विषयी कल्पना बोलून दाखविली. त्यावेळची परिस्थिती सहकाराची स्थिती अतिशय बिकट होती. बऱ्याच संस्था बुडाल्या होत्या, काही बुडण्याच्या मार्गावर होत्या. ठेवीदारात अस्थिरतेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत निर्णय घेणे फार जोखमीचे होते. मा. दादांनी व बँकींग क्षेत्राची परिपुर्ण माहिती असणारे विठ्ठल साळुंखे यांनी त्यावरती अभ्यास करून आव्हान पेलणेचे ठरविले. इतर संस्थांच्या झालेल्या चुका सुधारून कमी दरात पण सुरक्षित तारण घेऊन कर्ज पुरवठा करणेचा निर्णय दादांनी घेतला व २६ जुन २००२ रोजी संस्थेची स्थापना झाली. लगेच ११ जुलै २००२ रोजी संस्थेचे उद्घाटन मा. डॉ. पतंगरावजी कदम, मा. जयवंतरावजी पाटील, मा. हर्षवर्धनजी पाटील या तात्कालीन मंत्र्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी सर्व पक्षीय आजी माजी आमदार या कार्यक्रमास उपस्थित होते आणि तो शेवटचा राजकीय कार्यक्रम ठरला. संस्था सुरू झालेनंतर कोणतेही राजकारण न आणता व्यवहाराला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी ५०० सभासद, १ कोटी २५ लाखाच्या ठेवी जमा झाल्या. गलाई व्यवसायीकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. बेंगलोर, चेन्नई, नेल्लोर, मदुराई, सेलम, कोइमतुर, चेंगणा शेरी, कोट्टायम, त्रिशुर, कालीकत या भागातुन उदंड प्रतिसाद मिळाला. त्यावेळी सोने तारण कर्जाला भरमसाठ व्याज आकारले जात होते. स्ंस्थेने सुरवातीलाच अतिशय कमी व्याजदरात सोने तारण कर्ज पुरवठा केला व सावकारांची मक्तेदारी मोडीत काढली व गरजू लोकांना सक्षम पर्याय ऊभा केला. नंतरच्या काळात छोटे व्यापारी, भाजीपाला व्यापारी यांना कर्जपुरवठा करून त्यांना पतवान बनविले. ते कर्ज पिग्मीद्वारा परतफेड करून घेतले आणि खऱ्या अर्थाने सहकार अवतरला गेला.

      संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत गेली. आपल्या भागात असणारा यंत्रमाग, भाजीपाला, पोल्ट्री, द्राक्षे व्यवसायीक मंडळी सभासद होत गेला आणि संस्था सर्व क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करत गेली. संस्थेचे गलाई बांधव असणारे सभासद गलाई व्यवसायानिमित्त़ सर्व देशात पसरले असले कारणाने संस्थेचे कार्यक्षेत्र वाढ करणेची मागणी विविध राज्यातुन सभासदांकडून होत गेली. या मागणीचा विचार करून संस्थेने २०१२ साली मल्टी स्टेट दर्जा मिळविला आणि पश्चिम महाराष्ट्रातील मल्टी स्टेट असणारी पहिली संस्था ठरली.

     

       संस्थेने प्रथमपासूनच आधुनिकतेची कास धरली. संस्थेने पहिले चलन व पिग्मी गोळा करणे ही कामे संगणकावर केली गेली. कालांतराने सी.बी.एस. बँकींग होण्याचा मानसुध्दा आपल्याच संस्थेला मिळाला.

 

      “सेवा व सुरक्षा” हे तत्व़ संस्थेने सुरवातीपासुनच पाळले आहे. “ग्राहकांचे समाधान” ही सेवा संस्थेचे कर्मचारी तळमळीने पार पाडतात. त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहणेसाठी संचालक मंडळ विश्वस्त़ म्हणून काटेकोरपणे व सुरक्षित कर्जवाटप करते व ते वसुलीसाठी अटोकाट प्रयत्ऩ करते. म्हणूनच गेल्या पंधरा वर्षात थकबाकी व एन्.पी.ए. चे प्रमाण अत्यल्प़ राहिले आहे. सर्व करत असताना कर्मचारी, सभासद व ठेवीदार यांच्यात समान न्याय देत समतोलपणा राखला जातो आणि त्या पध्दतीचे धोरणात्मक़ निर्णय होतात. संस्था करत असलेला कारभार पुर्णपणे पारदर्शक ठेवला जातो. सभासदांना मुख्य़ कार्यालयात कामकाजा दिवशी दुपारी ३ ते ५ यावेळेत पुर्ण माहिती जाणून घेण्याची प्रथा सांभाळत असलेली एकमेव संस्था असेल. वार्षिक अहवालात इत्यंभुत माहिती असते. शासाकीय लेखापरीक्षण व त्यासंबंधी सर्व कामे वेळेत पुर्ण केली जातात. संस्थेला सातत्याने लेखापरीक्षण वर्ग “अ” मिळत असतो. या पाठीमागे निश्चित सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक या सर्वांचा संस्थेप्रती असणारा विश्वसा कर्मचारी यांची संस्थेबद्दल असणारी आत्मीयता, संचालक मंडळाचे पयत्ऩ कारणीभूत आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून संस्थेने तब्बल़ १० पुरस्कार मिळविले आहेत. स्व़निधी तरतुद करून आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. संस्थेची वाटचाल नियोजनपुर्वक उदिष्ट़पुर्तीच्या दिशेने चालू आहे. शिवप्रताप पतसंस्थेच्या शाखा विस्ताराच्या माध्यमातुन सेवेचा परीघ विस्तृत करण्याचा प्रयत्ऩ चालू आहे. संस्थेने सन २०१९ पर्यंत १०० कोटी ठेवी, १८० कोटी व्यवसाय पुर्ण करण्याचे उद्दिष्ट़ ठेवले आहे. सर्वांना बरोबर घेत यशाची पताका आपल्या सर्वांच्या सहकार्याने फडकवत ठेवणार आहे.

धन्यवाद!

ek-Jh- izrki'ksB ikaMwjax lkGqa[ks

laLFkkid] v/;{k

eq-iks ikjs] rk- [kkukiwj] ft- lkaxyh

v/;{k] uW'kuy xksYM vW.M flYOgj fjQk;ulZ vlksfl,'ku] ,ukZdqye] dsjG o f'koizrki vkf.k 'kkyhekj mn~;ksx leqg] foVk

9226474747

(०२३४७) २७३९९९

(०२३४७) २७४८९९, २७६३९९

भैरवनाथ थिएटर जवळ, लेंगरे रोड, विटा, ता- खानापूर, जि. सांगली ४१५ ३११

©2020 by shivpratap Multistate Co-operative Credit Society Ltd. Vita Developed by Rudra's Global Solutions, Kolhapur

  • Facebook
  • LinkedIn
  • WhatsApp
  • Twitter
  • Skype